
विनायक परब , मुंबई, ९ डिसेंबर
मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यसैनिक म्हणून जन्मठेप सोसणाऱ्या आणि जयोस्तुते, ने मजसी ने परत मातृभूमीला सारख्या अजरामर प्रेरणादायी कविता आपल्याला देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वतंत्र भारतात जो मान मिळणे आवश्यक होते, तो मिळाला नाही याची खंत आयुष्यभर लागून राहील, अशी खंत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली